Bjp । ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याने सोडला पक्ष

Bjp

Bjp । महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला. 10 वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडे तिकीट मागितले होते आणि हिंगोलीतून निवडणूक लढवायची होती. हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नसल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी भाजपचा निरोप घेतला आहे.

Assembly Election 2024 । ‘शरद पवारांनी असं वक्तव्य केलं असेल तर…’, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य

त्या यापूर्वी हिंगोलीच्या खासदार होत्या. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना सूर्यकांता पाटील यांनी लिहिले की, “गेल्या 10 वर्षांत मी खूप काही शिकले, मी पक्षाची ऋणी आहे, सूर्यकांता पाटील या पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होत्या.” 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Suryakanta Patil News)

Salman Khan । सलमान खान गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

जागावाटपात हिंगोलीची जागा शिवसेनेला मिळाली होती.

महायुतीतील जागावाटपानुसार हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आली होती. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भाजपने सूर्यकांता यांना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख केले होते. मात्र, शिवसेनेने हिंगोलीची जागा गमावली असून ही जागा उद्धव ठाकरेंच्या गोटात गेली.

Maharashtra Council Polls । सर्वात मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, पाच तास चालली भाजपची बैठक; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Spread the love