Baramati Loksabha । बारामती लोकसभेसाठी भाजपचा नवा डाव, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली जबाबदारी

Bjp Appoints Navnath Padalkar As Incharge Of Baramati Lok Sabha Constituency

Baramati Loksabha । बारामती : राज्यात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा बारामती लोकसभा मतदारसंघावर (Baramati Lok Sabha Constituency) जास्त लक्ष असणार आहे. हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर (Indapur) येथे झालेला ओबीसी (OBC) एल्गार महामेळावा खूप गाजला होता. (Latest Marathi News)

Czech Republic Firing । धक्कादायक! विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, १५ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) असा संघर्ष आहे. याचाच फायदा भाजप (BJP) घेताना दिसत आहे. बारामती लोकसभा प्रभारी म्हणून भाजपने नवनाथ पडळकर (Navnath Padalkar) यांच्या नावाची घोषणा केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पडळकर हे २०१९ च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना निवडणुकीत मिळाली होती.

Bus Accident । इंदापूरमध्ये बसचा भीषण अपघात! एक शिक्षक ठार तर विद्यार्थी जखमी

त्यांनी नुकताच ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्यांच्याकडे भाजपचे प्रदेश सचिव पद आहे, त्यामुळे पडळकर यांना पुढे करत बारामती लोकसभा जिंकण्यासाठी नवा डाव खेळत आहे. यंदा मोठ्या फरकाने बारामती लोकसभा जिंकू असा विश्वास नवनाथ पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

तुम्ही YouTube वरून अधिक पैसे कमवू शकाल, भारतीयांसाठी नवीन फिचर सुरु

Spread the love