Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

Bjp

Bjp । सध्या मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या भूमिकेचे पडसाद राजकीय वर्तुळा देखील उमटू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून यावर अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती मिळत आहे.

Maratha Reservation । ‘माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका’ म्हणत मराठा आरक्षणासाठी विष पिऊन तरुणाने केली आत्महत्या

माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ पवार यांनी केला आहे.

Baramti Plane Accident । धक्कादायक बातमी! बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक जखमी

एकनाथ पवार यांनी भाजप पक्ष सोडल्याने भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला फटका ही मानला जात आहे. त्याचबरोबर आपली पुढील राजकीय भूमिका दसऱ्याच्या दिवशी स्पष्ट करणार असल्याचे देखील एकनाथ पवार म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का! कट्टर शिवसैनिक करणार शिंदे गटात प्रवेश?

Spread the love