Site icon e लोकहित | Marathi News

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार बंडखोरी

BJP

BJP

Bjp

Bjp । ऐन निवडणूक (Loksabha election 2024) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय खलबत पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वी भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Prakash Ambedkar । मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे वाढणार महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी?

शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडीत सहभाग घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील अपक्ष नेत्यांमध्ये तसेच भाजपमध्ये संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून झाली आहे.

IPL 2024 । धक्कादायक! आयपीएलमुळे एका चाहत्याचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

कोण आहेत हरिश्चंद्र चव्हाण?

हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. 2019 मध्ये त्याला हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली.

Sharad Pawar । साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? मोठी माहिती समोर

Spread the love
Exit mobile version