Bjp । ब्रेकिंग! भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?

BJP Candidate List

Bjp । सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. सध्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.

Topers Ad

Sunil Tatkare । निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंची सर्वात मोठी घोषणा!

भाजपने सोलापूर मध्ये राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भंडारा-गोंदियातून सुनील मेढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी भाजपने २० उमेदवार जाहीर केले होते त्यानंतर आज ३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Loksabha Elections । सर्वात मोठी बातमी! समज देऊनही बंड, एकनाथ शिंदे करणार बड्या नेत्यावर कारवाई

पाहा भाजपची पहिली यादी

१) अकोला – अनूप धोत्रे

२) वर्धा – रामदास तडस

३) नागपूर – नितीन गडकरी

४) जळगाव – स्मिता वाघ

५) रावेर – रक्षा खडसे

६) नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर

७) जालना – रावसाहेब दानवे

८) दिंडोरी – भारती पवार

९) भिंवडी – कपिल पाटील

१०) माढा – रणजितसिंह निंबाळकर

११) सांगली – संजय काका पाटील

१२) मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा

१३) उत्तर मुंबई – पियूष गोयल

१४) चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार

१५) नंदुरबार – हिना गावित

१६) धुळे – सुभाष भामरे

१७) लातूर – सुधाकर श्रृंगारे

१८) पुणे – मुरलीधर मोहोळ

१९) अहमदनगर – सुजय विखे पाटील

२०) बीड – पंकजा मुंडे

भाजपची दुसरी यादी

१)सोलापूर – राम सातपुते

२) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे

३) गडचिरोली-चिमूर – अशोक नेते

Crime News । मंदिरात प्रवेश केला, देवाला नमस्कार करून पूजा केली आणि… भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार

Spread the love