Bjp । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक बडे नेते महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गत बैठकीचे सत्र देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. दरम्यान आता भाजपच्या कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत विधानसभेची रणनीती आखण्यात आली आहे.
Ajit Pawar । त्यामुळे मी राजकारणातून संन्यास घेईन…, अजित पवारांच धक्कादायक वक्तव्य
बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला विनोद तावडे, भूपेंद्र यादव उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक जागावाटप यासह वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. ही बैठक पार पडल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत माहिती दिली.
Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचे फोन आणि व्हॉट्सॲप हॅक
माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आगामी निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशन देखील पार पडेल. राज्यातील 288 जागांवर मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरू केल्या जातील. येत्या १५ दिवसांमध्ये हा कार्यक्रम नियोजित करण्यात येणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, “लवकरच जागा वाटपाची चर्चा सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते निवडणूकांच्या पुढच्या रणनीतीबद्दल भाष्य करतील असेही आशिष शेलार म्हणाले आहेत”.
Uddhav Thackeray । ‘उद्धव ठाकरेंना हिंदी-इंग्रजी येत नाही..’ बड्या नेत्याचा खोचक टोला