Bjp । लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे (Assembly Elections) लागले आहे. सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभेत पराभव झाला होता मात्र आता त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली आहे. (Latest Marathi News)
Bhushi Dam Tragedy । लोणावळ्यातील हृदयद्रावक अपघातावर मंत्री अनिल पाटील यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांच्या नावांचा समावेश आहे. मागच्या काही दिवसापूर्वी भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ नावांची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठविण्यात आली होती. यामधून पाच नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी द्या अशी मागणी वारंवार केली जात होती यामुळेच आता भाजपने हा निर्णय घेतला आहे.