Lok Sabha Election । ऐन निवडणूक काळात (Lok Sabha Election 2024) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने राज्याचे वातावरण आणखी पेटत चालले आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)
Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सर्वात मोठा खुलासा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात या मतदारसंघातून (Wayanad Lok Sabha Constituency) भाजपने (BJP) सुरेंद्रन (Surendran) यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे केरळ भाजपचे अध्यक्ष असलेल्या सुरेंद्रन यांच्याविरुद्ध तब्बल 242 गुन्हे दाखल आहेत. सुरेंद्रन यांनी निवडणुक आयोगाच्या सुचनांनुसार पक्षाच्या मुखपत्रात आपल्यावर असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती प्रकाशित केली आहे.
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! विदर्भातील बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश
यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर एर्नाकुलम येथील उमेदवार के. एस राधाकृष्णन यांच्याविरोधात 211 गुन्हे दाखल आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक उमेदवारांना आपल्याविरोधात असणाऱ्या दाखल सर्व गुन्ह्यांची माहिती कोणत्याही वृत्तपत्रात प्रकाशित करणे अनिवार्य केले आहे. पण गुन्ह्यांची माहिती प्रकाशित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.