भाजपचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात जागा रिक्त आहे. यापार्श्वभूमीवर लवकरच पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजप या निवडणूकीसाठी कोणाला संधी देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट याची भेट घेतली.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा पोटनिवडणूकी संदर्भातच गौरव बापट यांची भेट घेतली असावी आणि या पोटनिवडणूकीमध्ये बापट घरातील व्यक्ती भाजपकडून उभी राहील असा अंदाज सगळीकडे लावला जात आहे. या निवडणूकीसाठी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत.
ब्रेकिंग! अवघ्या काही तासातच होणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला… संपूर्ण राज्याच लक्ष
यामध्ये स्वरदा बापट ( Swarada Bapat) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण कसबा विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये मुक्ता टिळक यांच्या कुटूंबाला उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे टिळक कुटुंब नाराज झाले. याचा मोठा फटका भाजपला बसला. या निवडणूकीत बापट कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी न देणे भाजपसाठी महागात पडू शकते. यामुळे भाजपसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान आहे.