Site icon e लोकहित | Marathi News

भाजपने पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटले; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

BJP distributed money in elections with the help of police; A serious allegation by the Thackeray group

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची काल संध्याकाळी 5 वाजता सांगता झाली. पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धावपळ आणि गोंधळ आता थांबला आहे. दरम्यान कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवली ऑफर, “शेतात या आणि पाहिजे तितका कांदा फुकट न्या…”

आता यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात अनेक वेळा पोलिसांची मदत घेऊन पैसे वाटले जातात. मागच्या निवडणुकीमध्ये देखील बारामती, पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटलंच पुराव्यासह उघड झालं आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

भीषण अपघात! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला, २२ विद्यार्थी जखमी

दरम्यान, याचा निषेध करण्यासाठी रविंद्र धंगेकर आज (ता.25 ) कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपने पैशाचे वाटप सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी आहेत असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

“उद्धव ठाकरेच वाघ”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

यामुळे आज सकाळी 10 वाजता रविंद्र धंगेकरांच्या उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. कसब्यात रविंद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने ( Hemant Rasne) यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे केल्याने भाजपने पैसे वाटून नवीन डाव टाकल्याची चर्चा सध्या कसबा मतदारसंघात सुरू आहे.

“…तर इलॉन मस्क पेक्षा मी जास्त श्रीमंत असतो”, योगगुरू रामदेव बाबा यांचे विधान चर्चेत

Spread the love
Exit mobile version