Site icon e लोकहित | Marathi News

Bjp । अहमदनगरच्या राजकारणात खळबळ, शरद पवारांचा डाव; बडा नेता सोडणार भाजपची साथ?

Sharad Pawar

Bjp । अहमदनगरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी (Assembly elections) भाजपला (Bjp ) एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. पिचड कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे भाजपच्या आधारभूत गडात धक्का निर्माण होण्याची शक्यता आहे.

sanjay Raut । संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास; मानहानीच्या खटल्यात कोर्टाचा निर्णय

मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही पिचड कुटुंबाने पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. 2014 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या पिचडांनी एकवेळ राष्ट्रवादीत आपल्या स्थानाबद्दल विचार केला होता, पण 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा त्यांच्या घरवापसीची शक्यता असल्याने भाजपच्या समर्थकांमध्ये चिंतेचा वातावरण आहे.

Nashik Accident । नाशिक-जळगाव मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखम

पिचड कुटुंबाचे अकोले तालुक्यात मजबूत वर्चस्व असून, या भागात त्यांच्या स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मधुकर आणि वैभव पिचड यांची राष्ट्रवादीकडे वळण घेतल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. पिचड कुटुंबीयांच्या या संभाव्य निर्णयाने राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या तयारीत भाजपला नवे आव्हान सामोरे जावे लागणार आहे.

Havaman Andaj । महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, हवामान विभागाने दिला अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर

Spread the love
Exit mobile version