Accident News । भाजप माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघात! कारचा अक्षरशः चुराडा, आमदार मुलाचा हातच..

BJP former MLA's son's terrible accident! The car was literally crushed, the MLA's son's hand.

Accident News । मुंबई : देशात दररोज कुठे ना कुठे अपघात (Accident) घडत असतात, यातील काही अपघात इतके भयानक असतात की पाहूनच अंगावर काटा येतो. बऱ्यापैकी अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. परंतु या अपघातांमुळे कित्येक संसार उध्वस्त होत असतात. वाढते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहतुकीचे नियमदेखील (Traffic rules) कडक केले आहेत. तरीही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. (Latest Marathi News)

Political News । खरी राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? ‘या’ तारखेनंतर होणार फैसला, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचे मोठं विधान

सध्या असाच एक अपघात भाजपच्या माजी आमदाराच्या (BJP MLA) मुलाचा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वांद्रे-वरळी सी लिंकवरून जाताना मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांचा मुलगा तक्षील मेहता (Takshil Mehta) यांचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. आज सकाळी 7.30 च्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

Jalna News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

तक्षील यांच्या लेम्बोर्गिनी या कारचा वेग खूप होता. त्यामुळे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार वरळी सी लिंकवर रेलिंगला जाऊन धडकली. धडक जोरदार असल्याने कारचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे. तर तक्षील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने कारमधील इतर कोणाला मार लागला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

Crime News । धक्कदायक! उपचाराच्या नावाखाली डॉक्टरचे तरुणीसोबत नको ते कृत्य

Spread the love