Satara Lok Sabha । सातारा : राज्यात सध्या लोकसभेच्या (Lok Sabha) निवडणुकीचे चांगलेच वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरात प्रचार करत आहेत. अटीतटीच्या लढतीत यंदा कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता राजकीय वर्तुळात सर्वात मोठी बातमी आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
Lok Sabha Election । धक्कादायक! पैशांचं आमिष देऊन महिलांना करायला लावला प्रचार पण पुढे घडलं वेगळंच..
आज भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी मंगळवारी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने उदयनराजे भोसले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उदयनराजे भोसले यांनी काल उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अर्ज घेतला होता. त्याची त्यांनी अनामत रक्कम भरली होती. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती.
Sangli Politics । सांगलीत ठाकरे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का
अशातच आता आज मंगळवारी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात आता शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले (Shashikant Shinde vs Udayanraje Bhosale) असा सामना होणार आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणं? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.