
Sharad Pawar । जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. शहरातील सागर पार्क मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवारांनी मोदी सरकार आणि भाजपवर (BJP) जोरदार केली. “शेतकरी लाचार नाहीत. ते आपल्या कष्टाची किंमत मागत आहे,” असे शरद पवार म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ९ वर्षात काय केले आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. काहीही कारण नसताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना तुरुंगात टाकलं. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. स्त्रियांना जखमी केले शिवाय लहान मुलांना मारहाण केली. त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे’, असा गंभीर आरोप यावेळी शरद पवारांनी केला आहे.
Sharad Pawar । शरद पवारांनी मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला म्हणाले; “त्यावर …”
“पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. संपूर्ण देशाचा पाणी साठा कमी झाला झाल्याने शेतकरीवर्गावर संकट आले आहे.परंतु जर त्यांची इच्छा असेल तर ही परिस्थिती बदलू शकते. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. चुकीच्या लोकांच्या हातात राज्याचा कारभार गेला आहे. शेतकरी लाचार नाही, तो भीक मागत नाही. तो त्याच्या कष्टाची किंमत मागत आहे. ती मिळत नसेल तर संघर्ष करावा लागेल,” असे म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Milk Cow Species । ‘या’ आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, दिवसाला देतात 50 लिटरपेक्षा जास्त दूध