भाजपचे नेते नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. ते दररोज ठाकरे गटावर टीका करत असतात. ठाकरे गटावर टीका करण्याची नितेश राणे एकही संधी सोडत नाहीत. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या आहेत. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Nitesh Rane made serious allegations against Uddhav Thackeray)
राज्यांमध्ये दंगली घडवत उद्धव ठाकरेंना सत्ता बळकवायची आहे. असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, “ह्या ज्या दंगली होत आहेत त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये शरद पवार साहेबांच्या बाजूला बसला होता. या सर्व दंगली मध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
Gujarat Titans IPL 2023 । भर मैदानात हार्दिक पंड्या-आशिष नेहरामध्ये वाद, नेमकं काय झालं दोघांमध्ये?
मुस्लिम समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती हट्ट करत चादर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्याआधी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण सुरू झालं होतं. आता तर धार्मिक स्थळांवर कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे.उद्या घरातही यायला कमी करणार नाहीत, असं देखील नितेश राणे म्हणाले आहेत.
Arjun Tendulkar । ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! अर्जुन तेंडुलकर जखमी