bjp manifesto 2024 । 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये गरीबांना पुढील ५ वर्ष मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहेत. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे ७० वर्षांवरील लोकांसाठी देखील भाजपने मोठी घोषणा केली आहे.
७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिली आहे. त्याचबरोबर गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना असल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
Ajit Pawar । अजित पवारांना सर्वात मोठा धक्का, बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि याच जयंती दिनी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गारंटी’ असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.