
मुंबई : राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केलं.
“…अन्यथा चित्रपटगृहांना आग लावू; शाहरुखचा ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात, महंतांनी दिला इशारा
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ” शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलं आहे. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“हसावे का रडावे कळत नाही…”, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईतली महामोर्चाच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडायला हवे. आणि जर त्यांचे या मोर्चाने देखील डोळे उघडले नाहीत तर ते कधीच उघडू नये, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.