BJP Mla Firing । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार

BJP Mla Firing

BJP Mla Firing । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उल्हासनगर परिसरात मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News । लग्नाच्या चर्चेने घेतला प्रेयसीचा जीव, प्रियकराने आधी तिचा गळा दाबून खून केला आणि..

हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गोळीबारामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी अवस्थेत या दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis । छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? देवेंद्र फडणवीसांनी केले मोठं वक्तव्य

या घटनेची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. तर सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संताप देखील नागरिकाकडून व्यक्त केला जात आहे.

Eknath Shinde । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले होते. त्यानंतर हे प्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यापर्यंत गेले आणि यावेळी संतापलेल्या भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर एकापाठोपाठ जवळपास सहा गोळ्या झाडल्या.

Pune Accident News । पुण्यात थरकाप उडवणारा अपघात! रस्ता ओलांडताना बाईकस्वाराची व्यक्तीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

या गोळीबाराच्या हल्ल्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहे तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Poonam Pandey । मोठी बातमी! अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन; 32 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

या घटनेनंतर कल्याण पूर्वेत पुन्हा भाजप व शिंदे गट आमने-सामने उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Spread the love