Site icon e लोकहित | Marathi News

Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! आमदाराची तब्येत खालावली

Bjp

Bjp । मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेले अशोकनगरचे आमदार जजपाल सिंह जज्जी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. यावेळीही भाजपने अशोकनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार जज्जी यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट मिळाल्यानंतर जज्जी आपल्या विधानसभा मतदारसंघात सतत प्रचार करत होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली. मिळालेल्या माहितीनुसार, जजपाल सिंह जज्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशोकनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Crime News । धक्कादायक! महिलांवर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी जबरदस्ती? 3 अभिनेत्यांना अटक

माहितीनुसार, आमदार जजपाल सिंह जज्जी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर लगेचच त्यांना अशोकनगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. निवडणुकीच्या धामधुमीत जज्जी यांची प्रकृती खालावल्याने ते काही काळ निवडणुकीच्या कार्यक्रमापासून दूर राहणार आहेत. राजपूर येथे होणाऱ्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेला देखील ते उपस्थित राहू शकणार नाहीत.

Chhagan Bhujbal । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, यावेळीही जजपालसिंग जज्जी अशोकनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हरी बाबू राय यांना तिकीट दिले आहे. अशोकनगर विधानसभा जागेसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

8GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा सह Poco C65 लॉन्च

Spread the love
Exit mobile version