मुंबई : प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) यांची पोलीस कोठडीची विनंती न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. भाजपने राजा सिंह यांना निलंबित केले असले तरी ते पक्ष कार्यालयात पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Ajit Pawar: “अरे आत्ता होते काय, तिथं बसायला पाहिजे,”विधानसभा अधिवेशनात अजित पवार संतापले
महत्वाचं म्हणजे, आमदार राजा सिंह यांना आज पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हैदराबादच्या दक्षिण विभागाचे पोलिस उपायुक्त पी साई चैतन्य यांनी सांगितले की, राजाविरुद्ध धार्मिक श्रद्धेच्या अपमानाशी संबंधित कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,सोमवारी रात्री शहर पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयात आणि हैदराबादच्या इतर भागांमध्ये राजा सिंह यांनी अपमानजनक टिप्पणी करणारा व्हिडिओ जारी केल्यानंतर निदर्शने सुरू झाली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राजा सिंह यांनी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे आंदोलकांनी सांगितले आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.