Bjp । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जितेंद्र सुरेश सातव (Jitendra Suresh Satav) या राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे.
Amol Kolhe । “…त्यावेळी अमोल कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते” अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
पुणे या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये एका उद्घाटन कार्यक्रमावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. ससून रुग्णालयातील तृतीयपंथांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात हे सर्व घडल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे चांगले संतापले आणि त्यांना राग अनावर झाला ना. ही यावेळी त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल असे म्हणाले आहेत.
Aditya Thackeray । बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का