Site icon e लोकहित | Marathi News

Crime News । धक्कादायक! भाजप आमदाराच्या पुतण्यावर भर बाजारात बेछूट गोळीबार, जागीच झाला मृत्यू

Crime News

Crime News । मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे (Crime) प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही, असे बोलले जात आहे. अशातच आता भाजप आमदाराच्या पुतण्यावर (BJP MLA’s nephew killed) भर बाजारात बेछूट गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्येनंतर तणावाचं वातावरण पसरले आहे.

Politics News । उद्धव ठाकरे, मोदी पुन्हा एकत्र येणार? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितलं…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप (BJP) आमदार कविता पासवान (Kavita Paswan) यांच्या पुतण्याची नीरज पासवान यांच्यावर गोळीबार केला. यात नीरज पासवान (Neeraj Paswan) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Maharashtra Politics । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! तीन वेळा आमदार राहिलेला बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, नीरज पासवान हा माजी महापौर शिवराज पासवान हत्याकांड प्रकरणी आरोपी होता. नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर नीरजला जखमी अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात नेले पण तोपर्यंत डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra Politics । दमदाटी करून एकनाथ शिंदेंना अमित शहांनी शांत बसवलं, कोणी केला खळबळजनक दावा?

Spread the love
Exit mobile version