Site icon e लोकहित | Marathi News

भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…

BJP MP Brijbhushan Sambhaji misses talking about Maharaj; said…

पुणे येथे काल महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari) स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार पहायला मिळाला. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली.यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार रामदास तडस हे नेते उपस्थित होते.

मोठी बातमी! दिग्गज अभिनेते अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज

दरम्यान भाजप खासदार बृजभूषण सिंह ( Brujbhushan Sinh) यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते सांगण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या काळापासून उत्तर प्रदेश व महाराष्ट्राचे चांगले संबंध आहेत. असे म्हणत त्यांनी उपस्थितांना शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा दाखला दिला. यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून एक चूक झाली. आग्राभेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात दगाबाजीनं कैद केले होते. तेव्हा उत्तर प्रदेशच्या लोकांनी, आग्रा येथील जनतेने शाहूजी महाराजांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात पाठवण्याचं काम केले होते.”

“वडील कायम मारहाण करायचे म्हणून…”, वाचा उर्फी जावेदच्या संघर्षाची कहाणी

छत्रपती संभाजी महाराज ( Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी शाहू असा उल्लेख केला. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वाद निर्माण होऊ शकतात. याआधी देखील राजकीय नेत्यांकडून ऐतिहासिक संदर्भ देताना चुका होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे नकळत महापुरुषांचा अपमान होतो. या पार्श्वभूमीवर वेगळी समिती स्थापन करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत दिले होते.

मोठी बातमी! विमान कोसळून ३० जणांचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version