राजकीय वर्तुळात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. इथे कधीही काहीही होऊ शकत. कधी काळी जवळ असलेली माणसं दूर जाऊ शकतात तर दूर असलेली माणसं अचानक उडी मारून जवळ येऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक घटना घडली आहे, जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जाताना एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम ( Dr. Patangrao Kadam) यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार व देवेंद्र फडणवीस ( Sharad Pawar & Devendra Fadanvis) हे दोघेही उपस्थित होते. भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन समारंभ यावेळी पार पडला. पुणे येथील धनकवडी मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार व देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून आले.
“छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च” – शरद पवार
एकत्र प्रवास करताना या दोघांनी कोणत्या विषयावर चर्चा केली असेल ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे भाजप आक्रमक झाले असतानाच भाजप- राष्ट्रवादी मधील आघाडीच्या नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास करणे ही नव्या पक्ष आघाडीची नांदी तर नाही ना ? यावरून राज्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.
“मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड जनतेतून व्हावी”, अजित पवार यांची मागणी