राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी धर्मावरून वाद झाले आहेत. नुकतेच अहमदनगर शहरात एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचल्याचे प्रकरण घडले. अशातच पुन्हा कोल्हापुरात सात तरुणांनी औरंगजेबाचा स्टेटस ठेवला. त्यामुळे कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी कुटुंबातील मुलाने लग्नाला वऱ्हाड थेट बैलगाडीनं नेलं…
छत्रपती संभाजी नगरात शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी राज्यात होत असलेल्या धार्मिक दंगली वरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केलं आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपाला कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बजरंगबली कामाला आले नाहीत. त्यामुळे त्यांना राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, येथे जवळच औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला गाडले. असे सांगतानाच त्यांनी त्याला कोण जिवंत करत आहे? राज्यात कोण दंगली घडवत आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. ते म्हणाले, अचानक औरंग्याच्या अवलादी कशा निर्माण झाल्या, असे गृहमंत्री फडणवीस म्हणतात. मात्र त्या तुम्हीच निर्माण केल्या. आतापर्यंत दंगली घडवणाऱ्या दंगलखोरांवर कारवाई का झाली नाही? कोल्हापुरातील घडलेल्या दंगलीत ९० टक्के लोक हे बाहेरचे होते. त्यांना कोणी निरोप दिला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
ब्रेकिंग! बारामती, दौंड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू