
अगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान बारामती मतदारसंघासाठी भाजप ( BJP) विशेष प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय दौंड, पुरंदर, हवेली, भोर, फलटण, माळशिरस विधानसभा मतदारसंघांतील विकास कामांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.
मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाला ३९७६.८३ कोटी रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा भोर, माळशिरस, फलटण, खंडाळा या भागांना होणार आहे. यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता याच बैठकीत देण्यात आली आहे.
‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ म्हणत बारावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या
या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागामधील ६३ गावांत २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतपेरणी करण्यासाठी सरकारने हे निर्णय घेतले असल्याची चर्चा सुरु आहे. बारामती व माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचा ( NCP) बालेकिल्ला समजला जातो. यासाठी विरोधी पक्षाकडून याठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचितची उडी; बंडखोर राहुल कलाटे यांना आंबेडकरांचा पाठिंबा? चर्चांना उधाण