Bjp । आरक्षणाच्या मागणीवरून आता मराठा समाज आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आह, जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी सरकारला दिलेला कालावधी संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान मराठा बांधवांचा देखील त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटत असल्याचे दिसत आहे.
याच दरम्यान भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांना आरक्षण न दिल्या 2024 मध्ये निवडणूक लढवणार नाही असा इशारा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या आक्रमक पावित्र्यानंतर आमदार तानाजी मुटकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जर येत्या काही दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आगामी 2024 ची निवडणूक मी लढवणार नाही. मराठा बांधवांवरील अन्याय पदावर राहून सहन करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. येत्या अधिवेशनामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडू असे मुटकुळे म्हणाले आहेत.