Bjp । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या 5 विद्यमान आमदारांना मोठा धक्का?

Bjp

Bjp । राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, भाजपच्या गोटातून काही मोठी माहिती समोर आली आहे. भाजपकडून मुंबईतून पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि पक्षीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Havaman Andaj । सावधान! पुढील काही तास महाराष्ट्रावर मोठे संकट; या भागात हवामान विभागाने दिला पावसाचा इशारा

विशेष म्हणजे, भाजपचे विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना तिकीट दिले जाईल, असे बोलले जात आहे. याशिवाय, वर्सोव्यात भारती लव्हेकर यांच्या ऐवजी संजय पांडे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा विषय म्हणजे घाटकोपर पश्चिममधील राम कदम यांचा पत्ता कट होण्याची माहिती समोर आली आहे. राम कदम, जे नेहमी प्रसारमाध्यमांमध्ये सक्रिय असतात, यावेळी त्यांच्या सुमार कामगिरीवर भाजप नेतृत्त्वाने विचार करत असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मिहीर कोटेचा यांना पिछाडीवर जावे लागले होते, त्यामुळे त्यांना यंदा उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.

Politics News । धक्कादायक बातमी! शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; तणावाचे वातावरण

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. या यादीत कोणत्या नेत्यांचे नाव असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. आता पाहावे लागेल की, या यादीत कोणाची वर्णी लागते आणि पुढील निवडणुकांच्या रणांगणात कोणता चेहरा समोर येतो.

Bajaj Pulsar l बजाज कंपनी लाँच करणार Pulsar N125 बाईक; जाणून घ्या उत्कृष्ट फीचर्स आणि किंमत

Spread the love