Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Bjp

Bjp । लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या देखील बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमधील जागावाटपावरून नाराज असलेले केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime news | धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरू होते नको ते धंदे, पोलिसांनी सापळा रचला अन् ..

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस म्हणाले, 5-6 दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषदेत एनडीएने जागा जाहीर करेपर्यंत वाट पाहीन असे सांगितले होते. मी अत्यंत प्रामाणिकपणे एनडीएची सेवा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत, पण आमच्या पक्षावर आणि वैयक्तिकरित्या आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. असं ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

एनडीएच्या जागावाटपात एकही जागा मिळाली नाही

सोमवारी एनडीएने बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी पत्रक वाटपाची घोषणा केली. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एचएएममध्ये जागा विभागल्या गेल्या. त्याचबरोबर पशुपती कुमार पारस यांचा पक्ष राष्ट्रीय लोजपला या प्रभागात एकही जागा मिळालेली नाही. महायुतीत त्यांच्या पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

Indapur Crime । इंदापूर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; ज्याला भावासारखा जपलं त्यानेच गेम केला

Spread the love