Ravindra Dhangekar । पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातून काँग्रेसने (Congress) रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Muralidhar Mohol vs Ravindra Dhangekar)
Prithviraj Chavan । शरद पवारांनी आदेश दिले तर… पृथ्वीराज चव्हाण यांनी केली मोठी घोषणा
अशातच राज्याचे राजकारण एका वेगळ्याच कारणावरून तापले आहे. भाजपने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात महाविकास आघाडीचा अशिक्षित उमेदवार असा प्रचार भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. ‘रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास’, अशा आशयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“तुम्ही आता कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का? जनतेची नाळ आणि जनतेचा विकास यातच माझी पीएचडी झाली असून जनतेला काय हवं ते मला समजत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षणही आठवी होतं. वसंतदादा पाटील वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. ते चौथी पास होते,” असे धंगेकर म्हणाले आहेत.