BJP West Bengal | प्रचारादरम्यान घडलं भलतंच, भाजपच्या खासदाराने प्रचार करताना जबरदस्तीने घेतला महिलेचा किस

Bjp

BJP West Bengal | सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते जोरदार प्रचार करत आहेत. मात्र सध्या पश्चिम बंगालमध्ये (BJP West Bengal) प्रचारावेळी भलतंच घडलं आहे. बंगालमधील उत्तर मालदा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि पक्षाचे लोकसभा उमेदवार खगेन मुर्मू यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान एका महिलेच्या गालावर चुंबन घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

Dhairyashil Mohite Patil । भाजपला सर्वात मोठा धक्का! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

खगेन मुर्मू या महिलेचे चुंबन घेत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. सोमवारी श्रीहीपूर या गावात प्रचाराला गेले असताना त्या उमेदवारानं महिलेचा मुका घेतला. यावेळी त्यांचं फेसबुक लाईव्ह देखील सुरू होतं. त्यामध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाला. आणि त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आता सध्या सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकारांमुळे नेटकऱ्यांनी आणि मतदारांनी भाजप सरकारवर टीका केली.

Maharastra Politics । पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, भाजपला मोठं खिंडार; बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

मात्र संबंधित महिलेने देखील खगेन मुर्मू यांच्या या कृतीचा बचाव केला आणि व्हायरल झालेल्या चित्रांमधील अश्लीलता निदर्शनास आणणाऱ्यांवर टीका केली. महिलेने सांगितले की जर एखाद्या पुरुषाने आपल्या मुलीप्रमाणे एखाद्या महिलेचे चुंबन घेतले तर त्यात काहीही गैर नाही. असं स्वतः ती महिला म्हणाली आहे.

Madha Loksabha । शरद पवारांचा मोठा गेम, धैर्यशील मोहित पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Spread the love