Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! महायुतीत ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला

Maharashtra Politics । नवी दिल्ली : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच पक्षातील काही दिग्ग्ज नेते पक्षांतर करत आहेत. याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो. महायुतीत अजित पवार गट (Ajit Pawar group) आणि शिवसेना शिंदे गट (Shinde group) सहभागी झाल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची ठरू शकते. (Latest marathi news)

Dombivli । एटीएम फोडण्याच्या नादात चोरट्यांचा फसला डाव, 21 लाखांची झाली राखरांगोळी

अशातच आता महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप (BJP) राज्यामध्ये ३२ लोकसभेच्या जागा (BJP Loksabha Seats) लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला १६ जागा मिळणार आहेत. यामध्ये शिंदे गट १० जागा तर अजित पवार गट सहा जागा लढवणार आहे.

Amitabh Bachchan । चाहत्यांच्या चिंतेत वाढ! अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

याच पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा (JP Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दिल्लीमध्ये महत्वाची महत्वाची बैठक बोलवली असून बैठकीत भाजपच्या या ३२ लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाईल. भाजपकडून लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bigg Boss 17 । बिग बॉस 17 चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफी, रोख रक्कमेसह मिळणार ‘हे’ शानदार गिफ्ट

Spread the love