मुंबई : भाजपची सध्या पक्ष बांधणी सुरू आहे. दरम्यान यामुळे सप्टेंबरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या (bjp) प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाती घेतली आहे. बावनकुळे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान भाजपने आता पवारांची सत्ता असलेल्या बारामतीला आता टार्गेट केले आहे.
स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की,” मी बारामती दौरा करणार आहे तसेच मी स्वतः बारामतीवर लक्ष ठेवून असल्याने शरद पवारांच्या बारामतीत भाजप चमत्कार घडवेल का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात 9 केंद्रीय मंत्री 6 वेळा प्रवास करणार आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही 48 मतदारसंघात काम करत आहोत.
Chandrakant Khaire: शिंदे गटातील आमदार परत येणार; चंद्रकांत खैरेंचा दावा
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या कधीही राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकत नाही. मिटकर यांच्या पक्षाचं पुढे काय होणार? याबाबत मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलून घेतलं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. जयंत पाटलांनी जयंत पाटील यांनी सत्तेत असल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावं, काही दिवस आराम करावा असा टोलादेखील बावनकुळे यांनी लगावला.
Karan-Tejasswi: एस्केलेटरवर करण आणि तेजस्वीने केले एकमेकांना किस; पाहा व्हायरल VIDEO