Baramati Lok Sabha । मुंबई : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. परंतु यावर्षी निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे असणार आहे. कारण शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी दरी पडली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Latest Marathi News)
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड या लोकसभेच्या चार जागांची (Lok Sabha Seat) घोषणा केली आहे. घोषणेनंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता भाजपनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामतीची जागा भाजपकडून अजित पवार गटाला (BJP Mission Baramati) दिली जाणार आहे. जर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप ताकद लावेल.
Accident News । भीषण अपघात! भरधाव ट्रकची स्कुटरला जोरदार धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
परंतु, या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) खासदार आहेत. यामुळे अजित पवार गट सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देणार आहे, अशी चर्चा आहे. अजित पवार गट कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून बारामतीतून लोकसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. जर ही लढत (Sunetra Pawar vs Supriya Sule) झाली तर बारामतीकर कोणाला निवडून देणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल.