BJP । भाजपला मोठा धक्का! पत्रकार परिषद घेत बड्या अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

bjp zp chief ashwini patil resign

BJP । धुळे : विविध मागण्यांवरून सध्या राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. हिवाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी वेठीस धरले आहे. लवकरच राज्यात लोकसभा (Loksabha) आणि विधानसभेच्या (Vidhansabha) निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे सर्वनेते आपापल्या पक्षाची पक्षबांधणी करत आहेत तर दुसरीकडे भाजपची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. (Latest Marathi News)

Slap PM । गळ्यात पुष्पहार टाकायच्या निमित्ताने आला अन् थेट माजी पंतप्रधानांच्या कानशिलात लगावली

धुळ्यात भाजपमध्ये पक्षांतर्गत दबावामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी थेट पत्रकार परिषद घेतली आणि आपला राजीनामा दिला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील (Ashwini Patil) यांनी स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, त्यांनी यावेळी केलेल्या कामाची देखील माहिती दिली. (Dhule bjp ZP Chief)

Viral Video । धक्कादायक! बाईकवर स्टंट करणारे तरुणाला पडले महागात, अचानक रस्त्यावर पडला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

मागील काही महिन्यांपासून त्यांच्याच पक्षाचे सदस्य हे त्यांच्या राजीनामासाठी आग्रही होते. पक्षांतर्गत राजीनामाचा दबाव त्यांच्यावर टाकला. अखेर पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे अश्विनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Shreyas Talpade । मोठी बातमी! शूटिंगवरून परताना श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

Spread the love