Bjp । सध्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) सगळीकडे धामधूम सुरू आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील-बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील-बिराजदार यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. (Latest Marathi News )
प्रशांत पाटील-बिराजदार यांनी भाजपचे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोलापूर मध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रशांत पाटील-बिराजदार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मी मागच्या १० वर्षापासून भाजपसाठी काम करतोय. मात्र भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवले आहे. त्यामुळे आता भाजप सोडून आम्ही ठाकरे गटात प्रवेश केला आहे” असे ते म्हणाले आहेत.
Baramti News । धक्कादायक! बारामती गँगवार प्रकरणात मोठी अपडेट
त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला अनेकजण कंटाळले असल्याचे देखील बिराजदार यांनी म्हटल आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. येणाऱ्या काळात भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ठाकरे गटांमध्ये प्रवेश करतील असे देखील प्रशांत पाटील-बिराजदार यांनी म्हटलं आहे..