Bjp । निवडणुकीआधी भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

BJP

Bjp । नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections in Nashik) भाजपला (BJP) एक मोठा धक्का बसला आहे. नाशिक भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे (Yogesh Barde) आणि त्यांच्या सोबतच्या शंभरपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. योगेश बर्डे यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, भाजपाने शिवसेनेची तोडफोड केली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेल्या हिंदुत्वाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Ajit Pawar । “आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आहे”- अजित पवार

बर्डे म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात गेली 25 वर्ष युती होती. परंतु भाजपाने जेव्हा शिवसेनेची तोडफोड केली, तेव्हा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हिंदुत्वाची भावना रुजवली होती. भाजपाने त्या भावना कमी करण्याचा प्रयत्न केला.”

Reliance Digital offer । 13,000 रुपये देऊन खरेदी करा iPhone 16; रिलायन्स डिजिटलवर खास ऑफर

योगेश बर्डे यांचे हे वाक्य महत्त्वाचे ठरले आहे की, “भाजपाच्या कार्यकर्त्या म्हणून मला मनाला वेदना होत होत्या. त्यामुळे मी भाजपाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.” त्यांच्या सोबतच अनेक अन्य कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. बर्डे यांनी आगामी काळात दिंडोरी विधानसभा क्षेत्रात मेळावा घेण्याची योजना सांगितली आहे, ज्यामध्ये अधिक भाजप कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात सामील होतील.

Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर! देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेल्याचा गौप्यस्फोट

Spread the love