मागील काही दिवस पुण्यात कसबा चिंचवड ( Kasba & Chinchwad Assembly Elections) पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर झालेली नाराजी, नंतर दणक्यात झालेला प्रचार आणि शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे आरोप यामुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांनो ‘या’ कारणामुळे केळी काळी पडतात; जाणून घ्या वैज्ञानिक कारण
या मतमोजणीची पहिली आणि दुसरी फेरी संपली असून तिसऱ्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिल्या-दुसऱ्या फेरीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या फेरीमध्ये अश्विनी जगताप यांनी 903 मतांची आघाडी घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे हे तिसऱ्या फेरीत देखील पिछाडीवर गेले आहेत.
मात्र, भाजपच्या अश्विनी जगताप यांनी घेतलेली आघाडी किरकोळ असून बाकी फेऱ्यांमध्ये चित्र पालटण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सध्या एकदम काटे की टक्कर असे चित्र चिंचवडमध्ये दिसत आहे.
यंदा बारावीचा निकाल उशिरा लागणार? शिक्षकांनी टाकला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार