मुंबई : भाजपने (BJP)आता बारामती जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळेच आता बारामतीत (Baramati) भाजप नेत्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. अशातच केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या सुद्धा बारामतीत आल्या होत्या. आत्ताच नाही तर त्या अजून पाच ते सहा वेळा बारामतीत येणार आहेत. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrshekhar Bavankule) यांनी सूचक विधान केलं आहे.
Girish Bapat: “मी पक्षावर नाराज”, गिरीश बापट यांचा भाजपला घरचा अहेर
बावनकुळे म्हणाले की, सबकी बारी आती है, किसीका कोई गड नही होता. राष्ट्रवादीच्या अनेक बाबीना कंटाळून बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये येणार आहेत.आमचे बारामतीत 21 कार्यक्रम असतील.त्यातून मतदारसंघाचं विश्लेषण केलं जाईल.संघटन मजबूत करणे आणि गरीब कल्याण योजना राबवणे हा उद्देश आहे.
बारामतीत कोण उमेदवार द्यायचा हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. आताची निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदीच येतील. आतापर्यंत बारामतीत जी लढत झाली नाही. त्यापेक्षा जोरदार लढत आता बारामतीत होईल अस देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांनो आता कायमचे वीजबिल वाचवा, घ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ
बारामती बाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की,आजही बारामतीतील 40-45 टक्के जनता उपेक्षित आहे. संघर्ष निर्माण झाला तर विजय निश्चित होतो. 2024 ला कळेल बारामतीचा विकास झाला की नाही.आम्ही काटेवाडीत बूथ कमिटीची बैठक घेतलीय.शरद पवारांनी मोट बांधली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वागुरु मोदीच आहेत.बाकीचे लोक राजकीय व्हिजन ठेवतात.पण मजबूत भारत करण्याचं मोदींचं व्हिजन आहे, असंही ते म्हणाले.
16 लोकसभा पहिल्या टप्प्यात पूर्ण करणार
राज्यातल्या 16 लोकसभा पहिल्या टप्प्यात पूर्ण केल्या जाणार आहेत.भाजप-सेना युती राज्यातील सर्व निवडणुका लढवेल. महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा निवडून आणू. विशेष म्हणजे जनता धोकेबाजांना बाजूला करुन खऱ्या हिंदुत्वाला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.