Muralidhar Mohol । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. (Loksabha election) यंदा पुणेकरांना तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचीत बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनेदेखील मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. (Latest marathi news)
Rashmi Barve । “भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण”; रश्मी बर्वेंचा सर्वात गंभीर आरोप
भाजपचा (BJP) 6 एप्रिलला म्हणजे उद्या वर्धापन दिन आहे. यानिमित्त पुण्यात भाजपकडून ‘घर चलो अभियान’ राबवले जाणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात 3 लाख घरांमध्ये वाटणार एक विशेष पत्रकं वाटण्यात येणार आहेत. याबाबत पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या माहिती दिली आहे.
Beed Loksabha । बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग, ज्योती मेटेंनी लोकसभेपूर्वी घेतला मोठा निर्णय
विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील ‘घर चलो अभियान’ अभियानात सहभागी होणार आहेत. “देशात एकच पॅटर्न सुरू आहे, तो म्हणजे मोदी पॅटर्न. मोदी पॅटर्न समोर बाकीचे सर्व पॅटर्न फिके आहेत. पुण्यात फक्त मोदीजींचा पॅटर्न चालणार आहे. मोदी पुन्हा निवडून येऊन पंतप्रधान होतील”, असा विश्वास धीरज घाटे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवारांनी जाहीर केली दुसरी यादी; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी