
मुंबई : भाजपने (bjp) आगामी लोकसभा निवडणुकांना समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) बालेकिल्ला असलेल्या पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. एवढच नाही तर पुणे जिल्ह्याच्या (pune) बारामती (baramati) लोकसभा मतदार संघावर राज्य करण्यासाठी भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. दरम्यान भाजपच्या याच मिशन बारामतीचे (Baramati) आजपासून सुरुवात झाल्याचे दिसतय.याच कारण म्हणजे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) आज पुणे दौऱ्यावर आहेत.
Raju Srivastav Death: मोठी बातमी! कॉमेडीयन राजू श्रीवास्तवचे निधन
तसेच यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आणि संघटनात्मक आढावा घेतला जाईल. दरम्यान यावेळी अर्थमंत्री या भूमिकेतून त्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीपर्यंत बारामतीत 21 कार्यक्रम घेतले जातील, असं भाजपचं नियोजन आहे. त्यापैकी पहिल्याच कार्यक्रमासाठी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Gautami Patil: लावणीच्या नावावर गौतमी पाटीलने केले अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल, टीकांचा पडला पाऊस
दरम्यान भाजपचे माजी मंत्री आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यासंदर्भात काल एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, निर्मला सीतारमण यांचा तीन दिवस बारामती दौरा असेल. तसेच आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदेंनी पत्रकार परिषदेत केला.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
गेल्या अनेक वर्षांपासून बारमतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार घराण्याचा दबदबा आहे. दरम्यान या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणजेच शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यावर बारामतीच्या प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा मंगळवारी सुळे यांनी हे आव्हान मी सहज स्वीकारत असल्याचं म्हटलं. निर्मला सीतारमण बारामतीत आल्यानंतर त्यांना मी विनंती करते की, इथल्या अनेक संस्था त्यांनी पहाव्यात. तसेच कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पहाव्यात आणि महत्वाचं म्हणजे त्यांना वेश असेल तर मी स्वतः फिरून त्यांना बारामती दाखवेन, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.
Thyroid: तुम्हालाही सकाळी ‘ही’ समस्या जाणवते का? असू शकतात थायरॉईडची लक्षणे
आम्ही बारामती लढणारच – चंद्रशेखर बावनकुळे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही दिवसांपूर्वीच बारामतीत येण्याची शक्यता होती. याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौराही केला होता. यावेळी भारताला मजबूत करण्याचं मोदींचं व्हिजन आहे, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं. दरम्यान बारामती दौरा करताना बावनकुळेंनी आम्ही बारामती लढणारच. निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची. शरद पवारांनी इथं मोट बांधली असली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वगुरू नरेंद्र मोदीच आहेत अस विधान केले होते.