
गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच निवडणूक लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“मुलगा चेंगरला तरीही आंटी डान्स करण्यात मग्न…” पाहा व्हायरल Video
गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. पुण्यात कसब्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती भाजपमध्ये निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
“पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नसून आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार आहोत. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्ही देखील पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत.” असं विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.