Supriya Sule । जळगावामध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरती केली जाणार अशी जाहीरात समोर आली आहे. याच मुद्द्यावरून राज्य सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप (BJP) आणि सरकारला महाराष्ट्राचं नेमकं काय करायचं आहे? असा सवाल उपस्थित केला होता. (Latest Marathi News)
“आता तहसीलदार कंत्राटी पद्धतीनं नेमण्याचा घाट राज्यातल्या सरकारने घातला आहे. या सरकारने मुख्यमंत्री, पाहिजे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावे. जर उपहासाचा भाग सोडला, तर हे सरकार असंवेदनशील निर्णय का घेत आहे, याचे मला आश्चर्य वाटते,” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला होता. यावर भाजपने त्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
“ताई, विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण करू नका. जर आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल. परत राजकीय द्वेष म्हणून रडत बसू नका. कंत्राटी भरतीची संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि काही तुमच्यासारख्या राजकीय लोकप्रतिनिधिंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे चालू केलं आहे. आम्ही तोंड उघडले तर तुमच्या पक्षाला अवघड जाईल,” असा इशारा भाजपने दिला आहे.
Bus Accident । भीषण अपघात! बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी
“ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता, त्यावेळी काळ्या यादीत असणाऱ्या कंपन्यांना नोकरभरतीचे कंत्राट देऊन परीक्षा घेतल्या होत्या. सुप्रियाताई याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे. प्रितेश देशमुख सध्या जामिनावर बाहेर आहे. तुमच्या तत्कालीन सरकारला भरतीही रद्द करावी लागली होती,” असे भाजपने सांगितले आहे.
Viral Video | मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात दोन संघांमध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ