
Blue Drum Case । उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल याला अटक करण्यात आली आहे. सौरभची हत्या करून, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्या तुकड्यांना निळ्या ड्रममध्ये टाकण्यात आले होते. या घटनेनंतर निळ्या ड्रमचा उल्लेख सतत माध्यमांमध्ये होऊ लागला आहे आणि त्याची विक्री थांबली आहे.
Devendra Fadnavis । राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!
हत्येची बातमी समोर येताच मेरठमधील ड्रम विक्रेत्यांच्या दुकाणात शंभर टक्के शांती पसरली आहे. ग्राहक निळ्या ड्रमकडे अजिबात आकर्षित होत नाहीत. दरम्यान, ड्रम विक्रेते या वर्तमनुसार ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तरीही त्यांना याचा लाभ मिळत नाही. दुकानदारांचा असा ठाम विश्वास आहे की, “ड्रमला कोणताही दोष नाही, त्याचा वापर पाणी आणि धान्य ठेवण्यासाठी होतो.” त्यांना आता त्यांच्या विक्रीसाठी ग्राहकांची ओळख (आयडी) पाहूनच ड्रम विकावा लागणार आहे.
सोशल मीडियावर या निळ्या ड्रमची थट्टा सुरु झाली आहे, ज्यामुळे त्याचे आणखी वाईट चित्र तयार झाले आहे. ‘निळा ड्रम घरी न्या, किंवा फुकट घ्या’ असं जोक्स व्हायरल होत आहेत. निळ्या ड्रमची छाया समाजात अशी पसरली आहे की, लोक त्यास एक खतरनाक वस्तू म्हणून पाहत आहेत. या घटनेने ड्रम विक्रेत्यांना मात्र मोठं आर्थिक संकट उभं केलं आहे.
Supriya Sule । जयकुमार गोरे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा घणाघात, सरकारवर गंभीर आरोप