गेल्या अनेक वर्षांपासून एसटी स्टँड ते मराठी शाळा हा गावाच्या मुख्य रहदारीचा रस्ता खराब झालेला असून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण (Encroachment) झालेले आहे.जड वाहतुकीने (Heavy traffic) रस्ता पूर्णपणे खचलेला आहे.वेळोवेळी ग्रामपंचायत आणि BNC याना निवेदन देऊन देखील रस्ता दुरुस्त झाला नाही.आज संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने रस्ता रोको करून खड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)
Nitin Desai suicide । ब्रेकिंग! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मांडवगणमध्ये (Mandavagan) जिथं देशातील तरुण पिढी घडवली जाते त्या शाळेला जायला लहान मुलांना रस्ता नाही. खड्ड्यांमध्ये गुडघाभर साचलेल्या पाण्यातून मुलांना अन नागरिकांना ये जा करावी लागत आहे. या खड्ड्यांनी पावसाळ्यात पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याकडे आज प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
Success Story। शेतकऱ्याचा नादच खुळा ! अवघ्या 20 गुंठ्याच्या काकडीतून कमावले साडेतीन लाख रुपये
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने BNC चे अधिकारी श्री.निमसे,ग्रामविकास अधिकारी श्री.राऊत भाऊसाहेब यांना निवेदन देण्यात आले. श्री निमसे यांनी एक महिन्यात सर्व अतिक्रमण हटवून RCC रस्ता चे टेंडर काढून महिना भरात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र घोडके,श्री कण्हेरकर यांनी नागरिकांच्या जन भावना तीव्र असून प्रशासनाने रस्त्या लवकरात लवकर दुरुस्त करून आणि रस्त्याचे काम दर्जेदार करून नागरिकांची होणारी गैरसोय बंद करावी, असे सांगितले.
YouTube Account। सावधान! तुम्हीही यूट्यूब वापरताना करताय का ही चूक? वेळीच थांबा नाहीतर..
महिनाभरात रस्त्याचे RCC काम सुरू न झाल्यास BNC अधिकारी अन ग्रामपंचायात मधील सत्ताधारी आणि विरोधक यांना रस्त्यात पडलेल्या खड्यानी बसविण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.संग्राम देशमुख यांनी दिला आहे. यावेळी राजेंद्र घोडके,विनोद देशमुख,कण्हेरकर मेजर,डॉ.लखन लोखंडे,योगेश देशमुख,जगदीश शिंदे,नितीन भोसले,भाऊ बोरुडे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Congress | “शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार”; मुख्यमंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ