Tanuja Hospitalised । अभिनेत्री काजोलच्या आई तनुजा यांची तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये केले दाखल; नेमकं कारण काय?

Bollywood Actress Kajol Devgan Mother Tanuja Hospitalized

Tanuja Hospitalised । मुंबई : बॉलिवुड विश्वातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात ICU मध्ये उपचार (Actress Tanuja Hospitalised) सुरु आहेत. त्या अभिनेत्री काजोलच्या (Kajol Devgan) आई आहेत. ८० वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीला नेमकं कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल केले याची अजून माहिती मिळाली नाही. (Kajol Devgan Mother Tanuja Hospitalized)

Ranbir Kapoor । पठाण, गदरला मागे टाकत ‘ॲनिमल’ने केला विक्रम, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या तब्येतीची माहिती समोर आल्यावर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तनुजा यांनी फक्त हिंदी नाही तर बंगाली चित्रपटांमध्ये (Tanuja Film) काम केलं आहे. त्यांनी चित्रपट निर्माता शोमू मुखर्जी यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना काजोल आणि तनिषा मुखर्जी मुली आहेत.

Accident News । ओव्हरटेक करणं आलं अंगलट, एका चुकीमुळे क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं

तनुजा यांनी 1950 साली ‘हमारी बेटी’ मधून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्यांची मोठी बहीण नूतनसोबत झळकल्या होत्या तर तनुजा बालकलाकाराच्या भूमिकेत दिसल्या. त्यानंतर 1961 मध्ये तनुजा यांनी ‘हमरी याद आएगी’ या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम केले. त्याशिवाय त्यांनी ‘ज्वेल थीफ’, ‘पैसा या प्यार’, ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘मेरे जीवन साथी’ या चित्रपटात काम केले.

Tamil Nadu Rain । तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ; शाळा-कॉलेज बंद, गाड्याही रद्द

Spread the love