बॉलीवूड स्टार शाहरुख खान याला मुंबईमध्ये शनिवारी विमानतळावर अडवून ठेवण्यात आलं, शाहरुख संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहून परतला होता, त्यावेळी मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखल असल्याची माहिती मिळाली.
संयुक्त अरब मधून शाहरुख परतला होता, अचानक त्याला रोखण्यात आलं, रोखण्या मागचे कारण असे की त्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हरस् होते, त्या कव्हर ची किंमत 18 लाख इतकी आहे. त्यामुळे शाहरुखला कस्टम ड्युटी 6.83 लाख भरावी लागली.
शेतकऱ्याची कमाल! पुण्यामध्ये केली सफरचंदाची शेती
शाहरुख तसेच त्याच्या टीमला मुंबई विमानतळावर शुक्रवार रात्री कस्टम विभागाने रोखलं, त्याच्या बॅगेमध्ये अनेक किमती घड्याळे सापडली त्यामध्ये बाबून, झुबर्क घड्याळे, रोलेक्स चे बॉक्स 6, ऍपल ची महागडी घड्याळे, तसेच काही रिकाम्या घड्याळांचे बॉक्स देखील सापडले, कस्टम विभागाने ह्या घड्याळ्यांचे मूल्यांकन केले असता, किंमत त्यावर 17 लाख 56 हजार 500 रुपये कस्टम ड्युटी लावण्यात आली. 1 तास चौकशी केली असता शेवटी त्याला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरून सोडण्यात आले. शाहरुख त्याच्या खाजगी चार्टर्ड प्लेन ने दुबई वरून मुंबई विमानतळावर पोहोचला होता.
‘ही’ आहेत भारतातील भयानक रेल्वे स्थानके तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर
समोर आलेल्या माहितीनुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवी याने कस्टम पेमेंट केले आहेत, याचे बिल रवीच्या नावावर आहे, त्यांच्या माहितीनुसार शाहरुख खानच्या स्वतःच्या क्रेडिट कार्ड वरून भरण्यात आले आहे.
लहान मुलाच्या स्वप्नपूर्ती साठी राहुल गांधींचा पुढाकार; इंजिनीअर व्हायचे म्हणताच दिली लॅपटॉपची भेट!