प्रेम ( Love) ही अतिशय नितळ, निर्मळ आणि निरागस भावना समजली जाते. प्रेमाला कशाचेव बंधन नसते. जुन्या काळातील प्रेम प्रकरणे ( Love Stories) लोक आजही आवडीने वाचतात. अमृता-इमरोज पासून ते सिनेसृष्टीतल्या कलाकारांपर्यंतची प्रेम प्रकरणे आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ ( Aalok Nath) व अभिनेत्री नीना गुप्ता ( Nina Gupta) यांचे प्रेमप्रकरण त्यातलेच एक आहे.
अभिनेते आलोक गुप्ता यांनी हम साथ साथ है, हम आपके है कौंन, विवाह यांसारख्या चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका केली. त्यांच्या या भूमिका लोकांना प्रचंड आवडल्या. यामुळे त्याकाळी ते ‘बॉलिवूडचे बाऊजी’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. एकेकाळी आलोक नाथ हे बुनियाद या मालिकेमध्ये काम करत होते. यावेळी अभिनेत्री नीना गुप्ता या संस्कारी सुनेच्या भूमिकेत होत्या.
एकत्र काम करत असताना बॉलिवूडच्या या बाऊजींचा आपल्या सुनेवर म्हणजेच नीना गुप्ता यांच्यावर जीव जडला. मात्र सासऱ्याची आणि सुनेची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. नीना गुप्ता या एका दुसऱ्या व्यक्तीसीबत रिलेशनशीप मध्ये असल्याने आलोक नाथ व त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. मलिका संपण्याआधीच ते दोघेही वेगळे झाले होते.
‘म्हणून कर्नाटकने भाजपला नाकारले’; विधानसभा निवडणूकीचा निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया