भटक्या कुत्र्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर

Bombay High Court took 'this' important decision regarding stray dogs; Read in detail

मुंबई : आत्तापर्यंत आपण भटक्या कुत्र्यांचा (stray dogs) आसपासच्या परिसरातील नागरिकांवर (peoples) होणारा हल्ला तसेच या भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाच्या (Dogs attack) घटना पाहिल्या आहेत. दरम्यान या होणाऱ्या त्रासासंदर्भात रहिवाश्यांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारीही (Complaints) केल्या आहेत. परंतु याबाबतीत तोडगा काढण्यात प्रशासन अनेकवेळा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान दुसरीकडे प्राणीमित्र संघटनांकडून भटक्या कुत्र्यांना होणारा जाच अमानवीय आहे असा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे.

T20 World Cup: सुपर 12 चा टप्पा आजपासून सुरू, टीम इंडिया कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार? वाचा सविस्तर

दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर (the Nagpur Bench) यासंदर्भातली सुनावणी पार पडली. यावेळी भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्या प्राणीमित्रांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. खरतर नागपूरच्या धंतोली नागरिक मंडळाकडून २००६मध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या त्रासासांदर्भात एक याचिका दाखल केली होती.

Abdul Sattar: “शेतकऱ्यांनो निराश होऊ नका”, अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; १५ दिवसात मिळणार मदत

दरम्यान या याचिकेत भटक्या कुत्र्यांकडून परिसरातील रहिवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. अस असूनही काही प्राणीमित्रांकडून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या कृतीमुळे या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. असा उल्लेख याचिकेत करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सुनावणी उच्च न्यायालये घेऊ शकतात, असे निर्देश होते. दरम्यान शुक्रवारी त्यासंदर्भात सुनावणी झाली.

तरुणांनो मनसोक्त दारु प्या! ‘या’ सरकारचे आगळेवेगळे आवाहन; वाचा सविस्तर

सुनावणीत काय दिले आदेश?

या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती सुनिल शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर झाली. दरम्यान सुनावणी घेताना न्यायालयाने प्राणीमित्रांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले आहेत. “प्राणीमित्रांनी भटक्या कुत्र्यांना खुशाल खाऊ घालावे. पण अशा प्रकारची कृती ही फक्त घरीच होऊ शकते. त्यामुळे आता कोणालाही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालता येणार नाही.

नेहाची पुन्हा एन्ट्री होणार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहाचा नवा लूक चर्चेत

जर एखाद्या व्यक्तीला खरच भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचे असेल तर त्या संबंधित व्यक्तीने आधी भटक्या कुत्र्याला अधिकृतरीत्या दत्तक घेऊन त्याची नोंदणी नागपूर महानगर पालिकेकडे करणं बंधनकारक आहे. महत्वाची बाब म्हणजे जर घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी कुणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घातला, तर संबंधितांवर दंड आकारण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला असेल”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

Ketaki Chitale: “10 वर्षांनंतर मला तुरुंगात…” पुन्हा एकदा केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान हे आदेश नागपूर पालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील परिसरापुरताच लागू असेल. दरम्यान आता राज्याच्या इतर भागातूनही अशाच प्रकारची मागणी होऊ लागली आहे. इतकंच नाही तर न्यायालयाने निकाल देताना नागरिकांच्या तक्रारीवरून नागपूर पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांना पकडून इतर ठिकाणी हलवण्याचा पूर्ण अधिकार असेल, असं स्पष्ट केलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *