Site icon e लोकहित | Marathi News

मुंबईत पहिल्याच पावसाचा फटका, इमारत कोसळून दोघांचा बळी

Mumbai

अनेक दिवसांपासून सर्वचजण पावसाचीआतुरतेने वाट पाहत आहे. अखेर हळूहळू ठिकठिकाणी पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झाली आहे. परंतु नियोजन व्यवस्थित नसल्याने पहिल्याच पावसाने मुंबईची (Mumbai) तुंबई झाली आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. अशातच आता एक धक्कदायक घटना समोर येत आहे. मुंबईच्या पहिल्याच पावसाने दोन जणांचा बळी घेतला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । ‘त्यात चुकीचे काय आहे?’ ‘त्या’ मागणीवरून अजित पवार यांचे स्पष्टीकरण

घाटकोपरमधील (Ghatkopar) ही धक्कादायक घटना आहे. येथील एक इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली चार जण अडकले होते. परंतु त्यातील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे तर दोन जणांना वाचवण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. याला जबाबदार कोण? असा नागरिकांमधून संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

देशभरात तुफान पाऊस; कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी; पाहा धक्कादायक व्हिडीओ

काल सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचला होता, त्यामुळे वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. नरेश पलांडे वय 56, अल्का महादेव पलांडे वय 94 अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या दुर्घटनेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धक्कादायक घटना! महिला कारघेऊन रस्त्याने चालली होती अचानक आला मोठा पूर अन्.. पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Spread the love
Exit mobile version